नोंदणी क्र. एफ - ५१/सातारा/३०/४/१९६३/ मुंबई/६९/एन. एस. टी. आर

छत्रपती शिवाजी विद्यालय, कुंभरोशी

छत्रपती शिवाजी विद्यालय, कुंभरोशी

सातारा जिल्ह्यातील अनेक भूषणावह अलंकारापैकी एक म्हणजे शिवरायांचे चरण धुळीने पवित्र झालेला किल्ले प्रतापगड. या गडाच्या परिसरातील दुर्गम व कष्टकरी गरिबांचे मुलांचे शिक्षण होऊन ती विकसित व्हावी म्हणून कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव या संस्थेने १९९३ साली शिवरायांचे नावाने कुंभरोशी येथे माध्यमिक विदयालय सुरु केले.

कोयनेचा उगम महाबळेश्वरचे डोंगरामध्ये झाला आहे. व कोयना एज्युकेशन सोसायटीचा शैक्षणिक उगम याच गावी वाद वाडा कुंभरोशी येथे झाला आहे. हे सांगायला आम्हाला गर्व आहे.

या शैक्षणिक संस्थेच्या जडणघडणीत या परिसरातील अनेक ज्ञात अज्ञात व्यक्ती सहभागी आहेत या विद्यालयाच्या विकासात संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. किसन जाधव, उपाध्यक्ष मा.श्री.धो. ह. जाधव सचिव मा. श्री. टी. के. बाबर तसेच अन्य संचालक, मुख्याध्यापक शिक्षणप्रेमींचा सिंहाचा वाटा आहे.

विद्यालयाची माहिती :-

विद्यालयातील एकूण वर्ग : ३

मुख्याध्यापक : १

शिक्षक : ४

लेखनिक : १

आदेशपाल : २

विद्यार्थी : ६०

विद्यर्थिनी : ६४